सीडार रॅपिड्स (इंग्लिश: Cedar Rapids) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या आयोवा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (सर्वात मोठे शहरः दे मॉईन). आयोवाच्या पूर्व भागात व दे मॉईनच्या १०० मैल पूर्वेला वसलेल्या सीडार रॅपिड्सची लोकसंख्या सुमारे १.२६ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ४.२३ लाख एवढी आहे. आयोवा सिटी हे आयोवामधील मोठे शहर सीडार रॅपिड्सच्या २० मैल दक्षिणेला वसले आहे. आयोवामधील इतर नदीकाठी वसलेल्या शहरांप्रमाणे सीडार रॅपिड्स देखील पूरक्षेत्रात येते. २००८ साली आलेल्या महापूरामध्ये शहराच्या १४ टक्के भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
सीडार रॅपिड्सचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथील सीडार नदीमधील एका बेटावर बांधण्यात आलेले महापालिका भवन.
सीडार रॅपिड्स (आयोवा)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.