दे मॉईन (इंग्लिश: Des Moines) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील आयोवा राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. आयोवाच्या मध्य भागात वसलेल्या दे मॉईनची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २,१४,१३३ इतकी आहे तर दे मॉईन महानगर क्षेत्रात ५.६७ लाख रहिवासी वास्तव्य करतात.
अमेरिकेतील विमा उद्योगाचे दे मॉईन हे एक मोठे केंद्र आहे. २०१० साली फोर्ब्ज मासिकाने दे मॉईनला व्यापारासाठी सर्वोत्तम शहर असा दाखला दिला.
दे मॉईनची स्थापना २२ सप्टेंबर, १८५१ रोजी फोर्ट दे मॉईन या नावाने झाली. १८५७ मध्ये त्याचे नाव नुसते दे मॉईन असे बदलण्यात आले. या शहराला येथून वाहणाऱ्या दे मॉईन नदीचे नाव दिलेले आहे.
दे मॉईन (आयोवा)
यामागील विज्ञान आणि इतिहास.