आयोवा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

आयोवा

आयोवा (इंग्लिश: Iowa) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर-मध्य भागात वसलेले आयोवा हे एक कृषीप्रधान राज्य असून येथे मोठ्या प्रमाणावर मक्याची शेती होते. आयोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३०व्या क्रमांकाचे राज्य आहे.

आयोवाच्या उत्तरेला मिनेसोटा, वायव्येला साउथ डकोटा, पश्चिमेला नेब्रास्का, दक्षिणेला मिसूरी, ईशान्येला विस्कॉन्सिन तर पूर्वेला इलिनॉय ही राज्ये आहेत. दे मॉईन ही आयोवाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →