व्हियेना किंवा वीन (जर्मन: Wien) ही ऑस्ट्रिया देशाची राजधानी, ऑस्ट्रिया या देशातील ९ राज्यांपैकी एक राज्य व देशातील सर्वात मोठे शहर आहे. ऑस्ट्रियाच्या पूर्व भागात डॅन्यूब नदीच्या काठी वसलेल्या व्हियेना शहराची लोकसंख्या सुमारे १७.१४ लाख असून त्याच्या महानगर क्षेत्रात अंदाजे २४ लाख लोक (ऑस्ट्रियाच्या लोकसंख्येपैकी २५ टक्के) राहतात. व्हियेना शहर चेक प्रजासत्ताक, हंगेरी व स्लोव्हाकिया देशांच्या सीमेजवळ असून येथून ब्रातिस्लाव्हा ही स्लोव्हाकियाची राजधानी केवळ ६० किमी अंतरावर आहे.
इ.स.पू. ५व्या शतकापासून व्हियेना उल्लेख इतिहासात आहे. याचे मूळ नाव उइंदोबोना असे होते. इतिहासपूर्व रोमन साम्राज्यकाळात वसवण्यात आलेले व्हियेना शहर मध्य युगात ऑस्ट्रियन साम्राज्याची व नंतर ऑस्ट्रिया-हंगेरीची राजधानी होती. सध्या एक प्रगत व आधुनिक दर्जाचे शहर असलेल्या व्हियेनामध्ये ओपेकचे मुख्यालय तसेच संयुक्त राष्ट्रांची अनेक कार्यालये आहेत.
व्हियेना
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.