ब्रातिस्लाव्हा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ब्रातिस्लाव्हा

ब्रातिस्लाव्हा (स्लोव्हाक: Bratislava ; जर्मन: Pressburg पूर्वी Preßburg, हंगेरियन: Pozsony) ही मध्य युरोपातील स्लोव्हाकिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्रातिस्लाव्हा शहर स्लोव्हाकियाच्या पश्चिम भागात ऑस्ट्रिया व हंगेरी देशांच्या सीमेजवळ डॅन्युब नदीच्या काठांवर वसले आहे. इतर दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांजवळ असलेले ब्रातिस्लाव्हा हे जगातील एकमेव राष्ट्रीय राजधनीचे शहर आहे. एकमेकांपासून केवळ ६० किलोमीटर (३७ मैल) अंतरावर स्थित असणारी व्हियेना व ब्रातिस्लाव्हा ह्या युरोपातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात जवळील राजधान्या आहेत.

ऐतिहासिक काळापासून प्रेसबर्ग ह्या जर्मन नावाने ओळखले गेलेले हे शहर हंहेरीच्या राजतंत्रातील व हाब्जबर्ग साम्राज्यामधील एक प्रमुख शहर होते. १९९३ साली चेकोस्लोव्हाकियाची फाळणी झाल्यावर ब्रातिस्लाव्हा नवीन स्लोव्हाकिया देशाची राजधानी बनली. सध्या ४.५७ लाख शहरी व ७ लाख महानगरी लोकवस्ती असलेले ब्रातिस्लाव्हा हे स्लोव्हाकियाचे आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक केंद्र आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →