ग्रँड रॅपिड्स (इंग्लिश: Grand Rapids) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिशिगन राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (डेट्रॉईटखालोखाल) आहे. मिशिगनच्या पश्चिम भागात लेक मिशिगनपासून ४० मैल पूर्वेला ग्रँड नदीच्या काठावर वसलेल्या ग्रँड रॅपिड्स शहराची लोकसंख्या २०१० साली १.८८ लाख इतकी होती.
फर्निचर उत्पादनाच्या बाबतीत ग्रँड रॅपिड्सचा जगातील पाच सर्वात मोठ्या शहरांमध्ये उल्लेख होतो. त्यामुळे ह्या शहराला फर्निचर सिटी असे टोपणनाव मिळाले आहे. अमेरिकेचे ३८वे राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड ग्रँड रॅपिड्सचे रहिवासी होते.
ग्रँड रॅपिड्स (मिशिगन)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.