मिशिगन (इंग्लिश: Michigan) हे अमेरिकेच्या उत्तर भागातील एक राज्य आहे. मिशिगन हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ११वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने आठव्या क्रमांकाचे राज्य आहे.
जगातील सर्वात लांब गोड्या पाण्याच्या साठ्यांचा किनारा मिशिगनला लाभला आहे. भव्य सरोवर परिसरातील मिशिगन राज्याला पाच पैकी चार भव्य सरोवरांचा किनारा आहे (ओन्टारियो सरोवर वगळता). मिशिगन राज्य दोन द्वीपकल्पांचे बनले आहे. उत्तरेकडील द्वीपकल्प दक्षिणेकडील द्वीपकल्पापासून ८ किमी रुंद मॅकिनाउच्या सामुद्रधुनीने वेगळा केला आहे.
मिशिगनच्या उत्तरेला कॅनडाचा ओंटारियो हा प्रांत व सुपिरियर सरोवर, पूर्वेला ह्युरॉन सरोवर, आग्नेयेला ईरी सरोवर, दक्षिणेला इंडियाना व ओहायो तर पश्चिमेला मिशिगन सरोवर व विस्कॉन्सिन हे राज्य आहेत. लान्सिंग ही मिशिगनची राजधानी असून डेट्रॉईट हे सर्वात मोठे शहर आहे.
अमेरिकेतील वाहन उत्पादन उद्योगाचे मिशिगन हे केंद्र आहे. विसाव्या शतकामध्ये स्थापलेल्या तीन मोठ्या वाहन उत्पादन कंपन्यांमुळे डेट्रॉईट व मिशिगनची वेगाने भरभराट झाली.
मिशिगन
यामागील विज्ञान आणि इतिहास.