ओहायो (इंग्लिश: Ohio) हे अमेरिकेच्या मध्य भागातील एक राज्य आहे. ओहायो हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने सातव्या क्रमांकाचे राज्य आहे.
ओहायोच्या उत्तरेला ईरी सरोवर व मिशिगन, पश्चिमेला इंडियाना, दक्षिणेला केंटकी, आग्नेयेला वेस्ट व्हर्जिनिया तर पूर्वेला पेनसिल्व्हेनिया ही राज्ये आहेत. कोलंबस ही ओहायोची राजधानी असून सिनसिनाटी व क्लीव्हलंड ही दोन मोठी महानगरे आहेत.
अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागातील औद्योगिक पट्ट्याचा ओहायो हा एक महत्त्वाचा भाग आहे. मिशिगन मधील वाहन उद्योगासाठी सुटे भाग उत्पादन करणारे अनेक कारखाने ओहायोमध्ये आहेत.
ओहायो
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.