सान होजे देल काबो

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सान होजे देल काबो हे मेक्सिकोच्या बाशा कॅलिफोर्निया सुर राज्याच्या दक्षिण टोकावर वसलेले शहर आहे. जवळील काबो सान लुकास सह हे शहर बाशा कॅलिफोर्नियातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. २०११मध्ये येथे सुमारी ९,००,००० पर्यटकांनी भेट दिली होती. २०१० च्या जनगणनेनुसार येथील वस्ती ६९,७८८ होती.

या शहराची स्थापना मिझियाँ एस्तेरो दे लास पाल्मास दे सान होजे देल काबो अन्युइती नावाने इ.स. १७३० मध्ये झाली. कॅलिफोर्निया व मेक्सिकोतून फिलिपाइन्सला येजा करणारी जहाजे येथे थांबून जवळील रियो सान होजे या नदीतून गोडे पाणी भरून घेत असत.

लोस काबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ या शहरास व बाहा कालिफोर्निया सुर राज्याला विमानसेवा पुरवतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →