लोस काबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SJD, आप्रविको: MMSD) मेक्सिकोच्या बाहा कालिफोर्निया सुर राज्याच्या सान होजे देल काबो शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ सान होजे देल काबोसह काबो सान लुकास शहर आणि बाहा कालिफोर्निया सुर राज्याला विमानसेवा पुरवतो.
या विमानतळात तीन टर्मिनले तर चार काँकोर्स आहेत. टर्मिनल १ वर अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा आहे तर टर्मिनल ३ वर आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. प्रवाशांच्या वर्दळीनुसार मेक्सिकोमधील सातव्या क्रमांकाचा असलेल्या या विमानतळातून २०१३मध्ये ३३,८७,४०० प्रवाशांनी ये-जा केली. मागील वर्षापेक्षा १२.२% अधिक असलेल्या या संख्येतून बाहा कालिफोर्नियातील वर्दळीची कल्पना येते. या विमानतळावर सध्या मोठा ताण पडत असून अनेकदा विमानांना जागा मिळणे कठीण होते.
सप्टेंबर १५, इ.स. २०१४ रोजी सान होजे देल काबो शहर व या विमानतळाला हरिकेन ओडिल या चक्रीवादळाने तडाखा दिला. प्रचंड वेगाच्या वाऱ्याने विमानतळावर थांबवलेली विमाने जागची हलून एकमेकांवर आदळली. विमानतळ अनेक दिवस बंद ठेवण्यात आला होता व त्यामळे हजारे प्रवासी येथे अडकून पडले होते. मेक्सिकोच्या सरकारने या प्रवाशांना येथून विनामूल्य तिहुआना, माझात्लान, ग्वादालाहारा आणि मेक्सिको सिटी येथील विमानतळांवर पोचवून तेथून पुढच्या प्रवासाची सोय केली तसेच परदेशी नागरिकांना त्यांच्या वकीलातींशी संपर्क साधण्यासही मदत केली.
लोस काबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.