बाशा कालिफोर्निया सुर (स्पॅनिश: Baja California Sur; पर्यायी उच्चारः बाहा कालिफोर्निया सुर; अधिकृत नाव: बाशा कालिफोर्नियाचे स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या वायव्य भागात बाहा कालिफोर्निया द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात असलेल्या बाशा कालिफोर्नियाच्या पूर्वेला कॅलिफोर्नियाचे आखात, पश्चिमेस प्रशांत महासागर, तर उत्तरेला बाशा कालिफोर्निया हे राज्य आहेत. तुरळक लोकवस्ती असलेल्या बाशा कालिफोर्नियाची सुरची ला पाझ ही राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. याशिवाय राज्याच्या दक्षिण टोकावर वसलेली सान होजे देल काबो आणि काबो सान लुकास ही दोन शहरे प्रमुख पर्यटनस्थळे आहेत.
बाहा कालिफोर्निया ८ ऑक्टोबर, इ.स. १९७४ रोजी मेक्सिकोचे राज्य झाले. त्याआधी याला बाहा कालिफोर्नियाचा दक्षिण प्रदेश (एल तेरितोरियो सुर दे बाहा कालिफोर्निया) असे नाव होते.
हे राज्य कॅलिफोर्नियाच्या द्वीपकल्पाकवर २८व्या उत्तर अक्षांशाचा दक्षिणेस आहे. चिंचोळ्या पट्टीच्या स्वरूपात असलेला हा भूभाग सुमारे ७५० किमी उत्तर-दक्षिण तर १०० किमी पूर्व-पश्चिम असून याचे क्षेत्रफळ ७३,९०९ किमी२ आहे.
बाहा कालिफोर्निया सुर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?