कान्कुन आंतरराष्ट्रीय विमानतळ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कान्कुन आंतरराष्ट्रीय विमानतळ

कान्कुन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CUN, आप्रविको: MMUN) मेक्सिकोच्या कान्कुन शहरातील विमानतळ आहे. युकातान द्वीपकल्पावरील किंताना रो राज्यात असलेला हा विमानतळ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळाखालोखाल मेक्सिकोतील सगळ्यात व्यस्त विमानतळ आहे. २०१२मध्ये या विमानतळावरून १,४४,६३,४३५ प्रवाशांनी ये-जा केली. गेल्या काही दशकांत हा विमानतळ मेक्सिकोतील महत्त्वाचा विमानतळ झाला आहे.



येथे तीन प्रवासी टर्मिनल आणि दोन समांतर धावपट्ट्या आहेत. १,५०० मीटर लांबीच्या या दोन्ही धावपट्ट्या एकाचवेळी वापरल्या जाऊ शकतात. उत्तर अमेरिकेतील विमान चार्टर कंपन्या टर्मिनल १चा वापर करतात तर अंतर्देशीय तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे टर्मिनल २वरून ये-जा करतात. उत्तर अमेरिका आणि युरोपमधून ये-जा करणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे टर्मिनल ३चा वापर करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →