हीथ्रो विमानतळ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

हीथ्रो विमानतळ

लंडन हीथ्रो विमानतळ (आहसंवि: LHR, आप्रविको: EGLL) हा युनायटेड किंग्डम देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ लंडन शहराच्या हिलिंग्डन ह्या बरोमध्ये स्थित आहे. २०१२ साली ७ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱा हीथ्रो विमानतळ युरोपातील पहिल्या तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. २०२३मध्ये हा जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे असलेला विमानतळ आहे.

सध्या एकूण ९० पेक्षा अधिक हवाई वाहतूक कंपन्या हीथ्रो विमानतळ वापरतात व येथून १७० शहरांना सेवा पुरवली जाते. येथे ५ टर्मिनल्स व २ समांतर धावपट्ट्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →