लंडन सिटी विमानतळ (आहसंवि: LCY, आप्रविको: EGLC) हा इंग्लंड आणि युनायटेड किंग्डमची राजधानी लंडन शहरातील सहापैकी एक विमानतळ आहे. न्यूहॅमच्या बरो मधील रॉयल डॉक्स भागातील हा विमानतळ लंडन शहराच्या पूर्वेस अंदाजे ६ मैल (९.७ किमी) आणि कॅनरी व्हार्फच्या पूर्वेस ३ मैल (४.८ किमी) अंतरावर आहे. लंडनच्या आर्थिक उद्योगाच्या या दुहेरी केंद्रांतून लंडन सिटी विमानतळातील बव्हंश प्रवासी ये-जा करतात. हा विमानतळ १९८६-८७ विकसित केला. २०१६मध्ये कुवैत इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, ऑन्टॅरियो टीचर्स पेन्शन प्लान आणि इतर कंपन्यांनी हा विमानतळ विकत घेतला.
लंडन सिटी विमानतळाला एकच १,५०८ मीटर (४,९४८ फूट) लांबीची धावपट्टी आहे. येथे व्यावसायिक उड्डाणांशिवाय फक्त या विमानतळावर विमाने उतरवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अव्यावसायिक उड्डाणे होऊ शकतात. हा विमानतळ शहरमध्यावर असल्याने व आखूड धावपट्टी असल्याने येथे उतरण्यासाठी विमानांना ५.५° अंशाने किंवा अधिक तीव्र उतार घेउन उतरता येते. यामुळे येथे फक्त एम्ब्राएर ई-१९५-ई२, एरबस ए२२० आणि ए३१८ प्रकारच्या विमानांना ये-जा करण्यास परवानगी आहे. या विमानाचा विस्तार सुमारे ६० हेक्टर (१५० एकर) आहे.
२०१९ साली या विमानतळावरून ५१ लाख पेक्षा अधिक प्रवाशांनी ये-जा केली होती. हीथ्रो, गॅटविक, स्टॅनस्टेड आणि लुटॉन नंतर हा विमानतळ सर्वाधिक व्यस्त आहे तर यूकेमधील १४व्या क्रमांकाचा व्यस्त विमानतळ होता.
लंडन सिटी विमानतळ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!