कॅनेरी व्हार्फ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

कॅनेरी व्हार्फ

कॅनरी व्हार्फ हा इंग्लंडच्या लंडन शहरातील एक भाग आहे, टॉवर हॅमलेट्स या लंडनच्या बरोमध्ये आईल ऑफ डॉग्स जवळ असलेल्या कॅनरी व्हार्फचा समावेश ग्रेटर लंडन प्राधिकरणाने मध्य लंडन मध्ये केला आहे. कॅनेरी व्हार्फ हा लंडन शहर हे युनायटेड किंग्डम आणि जगातील मुख्य आर्थिक केंद्रांपैकी एक आहे, येथे अनेक गगनचुंबी इमारती आहेत. येथील वन कॅनड स्क्वेर ही इमारत यूकेमधी तिसऱ्या क्रमांकाची उंच इमारत आहे.

लंडनच्या पूर्व भागातील वेस्ट इंडिया डॉक्सच्या जागेवर विकसित केलेल्या कॅनरी व्हार्फमध्ये सुमारे १ कोटी ६० लाख चौरस फूट (१५ लाख चौरस मीटर) इतकी कार्यालय आणि दुकानांची जागा उपलब्ध आहे. यात कॅनडा स्क्वेर, कॅबोट स्क्वेर, वेस्टफेरी सर्कस, ज्युबिली पार्क आणि क्रॉसरेल प्लेस रूफ गार्डन यासह अनेक मोकळ्या सोडलेल्या जागा आणि उद्याने आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →