अपमिन्स्टर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

अपमिन्स्टर

अपमिन्स्टर हे लंडनचे एक उपनगरी शहर आहे. तसेच ते लंडन बरो ऑफ हेवरिंगचा एक भाग आहे. चेरिंग क्रॉसच्या पूर्व-ईशान्य दिशेस २६.६ किलोमीटर (१६.५ मैल) अंतरावर स्थित आहे. लंडन योजनेत हे स्थानिकदृष्ट्या महत्त्वाचे जिल्हा केंद्र आहे. यात बरेच शॉपिंग स्ट्रीट आहेत आणि मोठे रहिवासी क्षेत्र आहे. पूर्वी हे एक ग्रामीण गाव होते, तो एसेक्स काउन्टीमधील स्वतंत्र चर्च व स्वतंत्र धर्माधिकारी असलेला असा एक विभाग होता. हे शहर वाहतुकीच्या दृष्टीने चांगले जोडलेले आहे. हे लंडनला इ.स. १८८५ मध्ये रेल्वेने जोडले गेले होते. सध्या ते लंडन अंडरग्राउंड नेटवर्कवर टर्मिनल स्टेशन आहे. अपमिन्स्टरचा आर्थिक प्रगती शेतीपासून सुरू होऊन उपनगरापर्यंत झालेली आहे. २० व्या शतकात लंडनच्या उपनगरी विकासाचा एक भाग म्हणून अपमिन्स्टरने छाने पायंडा पाडला आहे. अपमिन्स्टरमध्ये लोकसंख्येत लक्षणीय वाढ दिसून येते. इ.स. १९३४ मध्ये होर्नचर्च अर्बन डिस्ट्रिक्टचा भाग बनला आणि इ.स. १९६५ पासून ग्रेटर लंडनचा भाग बनला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →