अंधेरी हे मुंबई शहराच्या अंधेरी भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. अंधेरी मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे सर्व जलद व धीम्या लोकलगाड्या थांबतात. पश्चिम रेल्वेमार्गावरील अंधेरी हे सर्वात वर्दळीचे स्थानक आहे. लोकल गाड्यांखेरीज येथे काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात.
मुंबई मेट्रोच्या मार्ग १वरील अंधेरी मेट्रो स्थानक अंधेरी रेल्वे स्थानकाच्या जवळच असून ही दोन्ही स्थानके पादचारी पुलाद्वारे जोडली गेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश साम्राज्याने १९२८ मध्ये साल्सेट-ट्रॉम्बे रेल्वे सेवा विकसित केल्या नंतर अंधेरी स्थानकास प्रथम स्थान प्राप्त झाले. २०१४ मध्ये जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकांसह स्टेशनचे १०३ कोटी (१$ दशलक्ष डॉलर्स) खर्च विस्तार करण्यात आले.
अंधेरी रेल्वे स्थानक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?