लाग्वार्डिया लिंक क्यू७० सिलेक्ट सिलेक्ट बस मार्ग तथा क्यू७० बस मार्ग हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील एक सार्वजनिक परिवहन मार्ग आहे. शहराच्या क्वीन्स बोरोमध्ये हा साधारणतः ब्रुकलिन क्वीन्स एक्सप्रेसवेच्या बाजूने धावतो. हा मार्ग सिक्स्टी फर्स्ट स्ट्रीट-वूडसाइड स्थानक आणि लाग्वार्डिया विमानतळ यांच्या दरम्यान धावणारा वर्तुळाकार मार्ग आहे. हा मार्ग विमानतळाला न्यू यॉर्क सिटी सबवे आणि लाँग आयलँड रेल रोडशी जोडतो. या मार्गावर लाग्वार्डिया विमानतळावरील टर्मिनल बी आणि टर्मिनल सी, जॅक्सन हाइट्स-रूझवेल्ट ॲव्हेन्यू स्थानक हे थांबे आहेत. या मार्गावरील सेवा एमटीए बस कंपनी चालवते.
ही सेवा मोफत असून तिकिट काढावे लागत नाही.
हा मार्ग ८ सप्टेंबर, २०१३ रोजी सुरू झाला. २०१८ साली या मार्गावरून १७ लाख प्रवाशांनी प्रवास केला.
या मार्गावरील सेवा २४ तास उपलब्ध आहे. यावरील बसमध्ये सामान ठेवण्यासाठी विशेष कप्पे असतात.
क्यू७० (न्यू यॉर्क बस मार्ग)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.