एर फ्रान्स

यामागील विज्ञान आणि इतिहास.

एर फ्रान्स (इंग्लिश: Air France) ही जगातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक आहे. एर फ्रान्सचे मुख्यालय पॅरिस शहरात आहे व सर्वात मोठे वाहतूककेंद्र (हब) पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. एर फ्रान्स जगातील ९१ देशांमधील १५४ शहरांमध्ये विमानसेवा पुरवते. भारतामधील मुंबई, दिल्ली व बंगळूर शहरांना सेवा पुरवते. ही एर फ्रांस-केएलएम ग्रुपचा भाग असलेली ही कंपनी स्काय टीमचा सुरुवातीपासून भाग आहे.

स्थापनेपासून सुमारे ७० वर्षे ही कंपनी फ्रांसची ध्वजवाहक विमानसेवा होती. २००३मध्ये नेदरलॅंड्सच्या केएलएम आणि एर फ्रांसचे एकत्रीकरण झाले.

एप्रिल २००१ ते मार्च २००२ दरम्यान एर फ्रांसने ४ कोटी ३३ लाख प्रवाशांची ने-आण केली. यावर्षी कंपनीची उलाढाल १२.५३ अब्ज युरो इतकी होती. हा आकडा जगातील सगळ्यात मोठा होता. नोव्हेंबर २००४मध्ये युरोपमधील एकूण विमानप्रवाशांपैकी २५%नी एर फ्रांस किंवा त्याच्या उपकंपनीद्वारे प्रवास केला होता.

सध्या एर फ्रांस आखूड पल्ल्याच्या मार्गांवर एरबस ए३२१, ए३२० आणि ए३१९ प्रकारची विमाने वापरते. लांब पल्ल्याच्या मार्गांवर एरबस आणि बोईंग कंपन्यांच्या विमानांचा वापर केला जातो.

हॉप! ही एर फ्रांसची उपकंपनी युरोपातील अनेक मार्गांवर सेवा पुरवते तर जून ही उपकंपनी युरोप तसेच आंतरखंडीय मार्गांवर किफायती विमानसेवा पुरवते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →