जून ही फ्रांसमधील विमानवाहतूक कंपनी आहे. पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळावर मुख्यालय आणि मुख्य तळ असलेली ही कंपनी एर फ्रांसची उपकंपनी आहे. एर फ्रांसच्या मते ही कंपनी तरुण वर्गासाठी, खासकरून मिलेनियल पिढीसाठी, आहे. ही कंपनी किफायती दरात विमानसेवा पुरवते व तशाच इतर विमानकंपन्यांशी स्पर्धा करते.
या कंपनीची उड्डाणे १ डिसेंबर, २०१७ रोजी बार्सेलोना, बर्लिन, लिस्बन आणि पोर्तो या शहरांपासून झाली. २०१८पासून आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील गंतव्यस्थानांचा समावेश केला गेला.
जून (एरलाइन)
या विषयावर तज्ञ बना.