सिॲटल–टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सिॲटल–टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ

सिॲटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SEA, आप्रविको: KSEA, एफ.ए.ए. स्थळसूचक: SEA) हा अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील सिॲटल शहरात असलेला विमानतळ आहे. वायव्य अमेरिकेतील सगळ्यात मोठ्या या विमानतळावरून उत्तर अमेरिकेतील प्रमुख शहरे तसेच आशिया आणि युरोपमधील मोठ्या शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. याला सीटॅक या नावानेही ओळखतात.

येथून उत्तर अमेरिकेतील सगळ्या मोठ्या शहरांना तसेच युरोप, मध्यपूर्व आणि आशियामधील बव्हंश मोठ्या शहरांना थेट विमानसेवा आहे. हा विमानतळ अलास्का एरलाइन्स आणि तिची उपकंपनी होरायझन एर यांचे मुख्य ठाणे असून डेल्टा एरलाइन्सचा मोठा तळ आहे. डेल्टा एरलाइन्स येथून अमेरिकेशिवाय युरोप आणि आशियाला थेट विमानसेवा पुरविते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →