जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ

जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ (आहसंवि: IAH, आप्रविको: KIAH, एफ.ए.ए. स्थळसूचक: IAH) हा अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

ह्युस्टन शहराच्या उत्तरेस २० मैल (३२ किमी) असलेला हा विमानतळ ह्युस्टन खेरीज शुगरलॅंड-बेटाउन उपनगरांनाही सेवा पुरवतो. १०,००० एकर (४० किमी²)वर पसरलेला हा विमानतळ डॅलस-फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळामागोमाग टेक्सासमधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विमानतळ आहे. याला अमेरिकेच्या ४१व्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुशचे नाव देण्यात आलेले आहे.

या विमानतळावरून २०११ साली ४,०१,८७,४४२ प्रवाशांनी ये-जा केली. त्यानुसार हा उत्तर अमेरिकेतील १०व्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ होता. येथे युनायटेड एरलाइन्सचे सगळ्यात मोठे ठाणे असून या विमानकंपनीने येथून १ कोटी ६६ लाख प्रवासी नेले. या विमानतळावर स्पिरिट एरलाइन्सचेही ठाणे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →