युनायटेड एरलाइन्स जगातील सगळ्यात मोठी विमानवाहतूक कंपनी आहे. अमेरिकेतील या कंपनीत ४८,००० कर्मचारी व ३६० विमाने आहेत.
युनायटेड कॉन्टिनेन्टल होल्डिंग्ज या कंपनीची उपकंपनी असलेल्या युनायटेड एरलाइन्सचे मुख्यालय शिकागो येथे आहे तर डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळ, वॉशिंग्टन डल्लेस आंतरराष्ट्रीय विमानतळ, सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ, लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नरिता आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून मोठ्या प्रमाणात उड्डाणे होतात. युनायटेड एरलाइन्स स्टार अलायन्स या विमानवाहतूक कंपनीगटाचा पहिल्यापासून भाग आहे व त्यांतर्गत १७० देशांत १,०००पेक्षा जास्त ठिकाणांहून प्रवाशांची ने-आण करते.
युनायटेड एरलाइन्स
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.