तुर्की एरलाइन्स (तुर्की: Türk Hava Yolları) ही तुर्कस्तान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९३३ साली स्थापन झालेली तुर्की एरलाइन्स तुर्कस्तानमधील ४१ व जगातील २०६ शहरांना विमानसेवा पुरवते. ह्या बाबतीत तुर्की एरलाइन्सचा जगामध्ये चौथा क्रमांक लागतो. तुर्की एरलाइन्स १ एप्रिल २००८ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे. यांचे प्रधान कार्यालय इस्तंबूल येथील येसिल्कोय मधील अटतुर्क विमानतळावरील तुर्की एरलाइन जनरल मॅनेजमेंट बिल्डिंग मध्ये आहे. याची मुख्य ठाणी इस्तंबूल विमानतळ, एसेंबोगा आंतरराष्ट्रीय विमानतळ, सबीहा गॉक्सेन आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तुर्की एरलाइन्स
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?