मलेशिया एरलाइन्स (मलाय: Sistem Penerbangan Malaysia) ही मलेशिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९७२ साली स्थापन झालेल्या मलेशिया एरलाइन्सचे मुख्यालय क्वालालंपूर महानगरामधील सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळावर असून क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा मुख्य विमानतळ आहे.
सुरुवातीला मलेशिया एरलाइन्स मलेशियन एर लाइन सिस्टम बेरड (MAS) या नावाने ओळखली जात होती. या एरलाइन्सचे ब्रॅंडेड नाव मलेशिया एर लाइन होते. ही एरलाइन मुख्यतः क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणि त्याच्या कोटा किनाबालू व कुचिंग या दुय्यम केंद्रातून पूर्ण एशिया, ओस्सानीय, यूरोप या खंडात विमान सेवा चालवते. ही विमान कंपनी मलेशियाची ध्वजवाहक व सर्व जगभरातील विमान कंपन्याशी संघटित आहे. यांचे मुख्य कार्यालय कौला लुंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.
मलेशिया एर लाइनच्या फायरफ्लाय आणि मासविंग्ज ह्या दोन सहकारी एर लाइन आहेत. त्यांची फायरफ्लाय एर लाइन पेनांग आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सुबांग विमानतळ पासून विमान सेवा देते. मासविंग्ज ही एर लाइन स्थानिक विमान सेवेवर लक्ष केन्द्रित करते. मलेशिया आये लाइन कडे युद्द सेवेचा विमान संच आहे तो क्संच मास विंग्जचे अखत्यारीत येतो आणि मालवाहातूक व प्रवाशी वाहतूक ही करते.
२०१४ साली झालेल्या मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७० व मलेशिया एरलाइन्स फ्लाइट १७ ह्या दोन मोठ्या विमान अपघातांमुळे मलेशिया एरलाइन्सच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला.
मलेशिया एरलाइन्स
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.