एतिहाद एरवेझ ही संयुक्त अरब अमिराती देशाच्या अबु धाबी शहरामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. २००३ साली स्थापन झालेली एतिहाद एरवेझ एमिरेट्स अमिरातीमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे. एतिहाद दर आठवड्याला जगातील ९६ शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूकीसाठी १,००० पेक्षा अधिक उड्डाणे करते.
२००३ साली अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नह्यान ह्याने एका शाही फर्मानाद्वारे एतिहादची स्थापना केली. १२ नोव्हेंबर २००३ रोजी एतिहादचे पहिले विमान बैरूतकडे उडाले. एतिहादच्या निर्माणापूर्वी अबु धाबी विमानतळ वापरणारी गल्फ एर ही प्रमुख कंपनी होती. तेव्हापासून एतिहादने आपला आवाका झपाट्याने वाढवला असून ति सध्या जगातील एक आघाडीची विमानकंपनी समजली जाते. एतिहादने एर बर्लिन, अलिटालिया, एर सेशेल्स, एर लिंगस, व्हर्जिन ऑस्ट्रेलिया इत्यादी अनेक परदेशी विमानकंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. १ ऑगस्ट २०१३ रोजी एतिहादने सर्बियाच्या राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी याट एरवेझमध्ये ४९ टक्के गुंतवणूक केली. एतिहादच्या मदतीने सर्बिया सरकारने याटची पुनर्रचना करून एर सर्बियाची निर्मिती केली. भारतामधील जेट एरवेझमध्ये देखील एतिहादने २४ टक्के गुंतवणूक केली आहे.
एतिहाद एरवेझ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.