एर बर्लिन

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

एर बर्लिन

एर बर्लिन PLC & Co. लुफ्तवेर्केर्स केजीचे बोधचीन्ह एरबर्लिन किंवा एरबर्लिन.कॉम आहे. जर्मन देशाची सर्वात मोठी असणारी लुफ्तान्सा एर लाइन नंतर ही मोठी दोन क्रमांकाची एर लाइन आणि प्रवाशी वाहतुकीचे दृष्टीने युरोपची आठ क्रमांकाची एर लाइन आहे. या एर लाइन ने बर्लिन टेगेल एरपोर्ट आणि दुस्सेल्डोर्फ एरपोर्ट येथे मुख्य केंद्र (hub) केलेले आहे. आणि तेथून 17 जर्मनीतील शहरे, काही युरोप मधील प्रमुख महानगरे आणि फावल्या वेळात दक्षिण युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील कित्येक ठिकाणी नेटवर्क चालते त्याच बरोबर करेबियन आणि अमेरिकेच्या अंतर युरोप मधील ठिकाणी सेवा दिली जाते.



एर बर्लिन पीएलसी अँड कंपनी लुफ्तवर्केर्स केजी', एर बर्लिन तथा एरबर्लिन.कॉम ही जर्मनीमधील एक मोठी विमान वाहतूक कंपनी होती. एकेकाळी प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत ही कंपनी लुफ्तांसामागोमाग जर्मनीमधील दुसरी सर्वात मोठी आणि युरोप

मधील दहावी सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी होती. याचे मुख्यालय बर्लिनमध्ये असून मुख्य तळ बर्लिन टेगेल विमानतळ व ड्युसेलडॉर्फ विमानतळ हे तिचे मुख्य तळ होते. २०१२ पासून दिवाळखोरी जाहीर करेपर्यंत ही कंपनी वनवर्ल्ड विमान वाहतूक युतीची सदस्य होती.

या विमान कंपनीची स्थापना १९७८ मध्ये अमेरिकन प्रदेशांतून पश्चिम बर्लिनला विमान सेवा पुरवण्यासाठी करण्यात आली होती. पूर्व जर्मनीच्या हवाई क्षेत्रावरील राजकीय निर्बंधांमुळे लुफ्तान्सा सारख्या पश्चिम जर्मन विमान कंपन्यांना तिथे सेवा देता येत नव्हती. १९९१ मध्ये जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर लगेचच एर बर्लिन ही जर्मन मालकीची कंपनी झाली आणि ती जर्मनीतील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक बनली. अनेक वर्षांच्या तोट्यानंतर एर बर्लिनने ऑगस्ट २०१७ मध्ये दिवाळखोरी जाहीर केली आणि दोन महिन्यांनंतर तिचे कामकाज पूर्णपणे थांबले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →