फिनएर

या विषयातील रहस्ये उलगडा.

फिनएर

फिनएअर (फिनिश: Finnair Oyj, स्वीडिश: Finnair Abp) ही फिनलंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२३ सालापासून कार्यामध्ये असलेली फिनएअर ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात जुनी विमानकंपनी आहे.

फिनएअरचे मुख्यालय हेलसिंकीच्या व्हंटा ह्या उपनगरात असून हेलसिंकी विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे.

फिनलंड सरकार प्रमुख भागधारक (५५.८%) असलेली फिनएर आणि त्याच्या उपकंपन्यांचा फिनलंडमधील आंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासी सेवेवर मोठा प्रभाव आहे. २०१५ मध्ये या कंपनीची सेवा युरोपमधील ६० देश, आशिया खंडातील १३ देश आणि उत्तर अमेरिका खंडातील ४ देशातील ठिकाणी १ कोटी प्रवाशांनी वापरली. जानेवारी २०१६ मध्ये या कंपनीचे ४,८१७ कर्मचारी होते.

फिनएरला १९६३ पासून अपघातात विमान किंवा जीवितहानी झालेली नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →