यू.एस. एरवेझ ही अमेरिका देशामधील एक प्रमुख विमान वाहतूक कंपनी होती. फेब्रुवारी २०१३ मध्ये अमेरिकन एरलाइन्स व यू.एस. एरवेझ ह्यांचे एकत्रीकरण होऊन जगातील सर्वात मोठ्या विमानकंपनीची स्थापना केली गेली. एकत्रित विमानकंपनी अमेरिकन एरलाइन्स ह्याच नावाने कार्यभार चालवेल. ८ एप्रिल २०१५ रोजी दोन्ही कंपन्यांचे अधिकृतपणे एकत्रीकरण पूर्ण झाले.
यूएस एरवेझ ही पूर्वी यूएस एर मुख्य एरलाइन म्हणून ओळखली जात होती. ती अमेरिकन फेडरल एविएशन ॲडमिनिष्ट्रेशनने यूएस एरलाइन आणि अमेरिकन एरलाइनना ८ एप्रिल २०१५ रोजी सिंगल ऑपरेटिंग सर्टिफिकेट(SOC) दिल्यानंतर बंद झाली. या दोन्हीची आरक्षण पद्दत आणि बुकिंग पद्दत दि. १७ ऑक्टोबर २०१५ रोजी या विमान सेवांचे एकत्रीकरण झाल्यानंतर एकत्रीकरण विचारात घेतले तरीसुद्दा इतर बाबी त्या क्षणांपर्यंत जशाच्या तशाच राहिल्या. यांची विमान सेवा आंतरराष्ट्रीय आणि अंतरदेशीय अशा दोन्ही ठिकाणी विशालकाय दूरवर पसरलेली आहे त्यात उत्तर अमेरिका,दक्षिण अमेरिका,यूरोप,मध्य पूर्व या खंडातील २४ देशातील १९३ आगमन ठिकाणांचा यात समावेश आहे. मार्च २०१४ मध्ये या एरलाइनने “वनवर्ल्डची” सभासद झाली तत्पूर्वी ही स्टार अलायन्सची सभासद होती. ही एरलाइन व्यवसायासाठी ३४३ जातीचे मेनलाइन जेट विमान, तसेच २७८ रिजिनल जेट,आणि टूर्बो प्रोप विमान करार पद्दतीने वापरते. सहाय्यक एरलाइन यूएस एरवेझ एक्सप्रेस व्हाया कोड शेरिंग करारावर वापरतात.
यू.एस. एरवेझ
थोडक्यात पण महत्त्वाचे.