जपान एरलाइन्स

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जपान एरलाइन्स

जपान एरलाइन्स (जपानी: 日本航空) ही जपान देशामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान वाहतूक कंपनी (ऑल निप्पॉन एरवेझ खालोखाल) आहे. १९५१ साली स्थापन झालेली जपान एरलाइन्स १९५३ ते १९८७ दरम्यान जपानची राष्ट्रीय विमानकंपनी होती. १९८७ साली जपान एरलाइन्सचे पूर्णपणे खाजगीकरण करण्यात आले.

सध्या जपान एरलाइन्स प्रवासी सेवा पुरवणारी जगातील सहाव्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. जपान एरलाइन्स ५९ देशांतर्गत तर ३३ आंतरराष्ट्रीय शहरांना विमानसेवा पुरवते.

ही जपानची ध्वजवाहक विमानकंपनी आहे व जपानमधील ऑल निप्पॉन एरवेझ नंतर दोन क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे. यांचे मुख्य कार्यालय जपानमधील तोक्यो मधील शिंनागवा येथे आहे. यांचे मुख्य केंद्र तोक्योचे नरीता आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ (हनेदा) त्याचबरोबर ओसाका येथील कांसई आंतरराष्ट्रीय विमानतळ व इतामी येथील ओसाका आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →