चायना इस्टर्न एरलाइन्स (中国东方航空公司, China Eastern Airlines) ही चीनच्या शांघाय शहरातील प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवणारी विमान वाहतूक कंपनी आहे. १९८८ साली स्थापन झालेल्या चायना ईस्टर्न एरलाइन्सने २०१४ मध्ये ८.३१ कोटी प्रवाशांची वाहतूक केली. प्रवासीसंख्येनुसार चीनमधील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. २०११ पासून ही कंपनी स्कायटीमचा भाग आहे.
२०१५ साली चायना ईस्टर्न एरलाइन्स ही चीनमधील तीन सर्वात मोठ्या विमानकंपन्यांपैकी एक होती(इतर दोन: एर चायना व चायना सदर्न एरलाइन्स).
चायना ईस्टर्न एरलाइन्स
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.