एशियाना एरलाइन्स

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

एशियाना एरलाइन्स

एशियाना एरलाइन्स (कोरियन: 아시아나항공) ही दक्षिण कोरिया देशामधील एक प्रमुख विमान वाहतूक कंपनी आहे. कोरियन एर खालोखाल दक्षिण कोरियामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असलेली एशियाना एरलाइन्स कोरियामधील १४ तर जगातील ९० शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.

सोल येथे एशियाना एरलाइन्सचे प्रधान कार्यालय आहे. ह्या एरलाइन्सचा देशांतर्गत वाहतूकीचा हब गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय वाहतूकीचा हब इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे. इतर एरलाइन्स सोबतच ही एरलाइन्स स्वदेशात १४ ठिकाणी आणि परदेशात ९० ठिकाणी प्रवाश्यांची वाहतूक करते. शिवाय संपूर्ण आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, आणि ओशियाणा या देशात मालवाहातूक करते. डिसेंबर २०१४पर्यंत या एरलाइन्सचे कार्यालयातील कर्मचारी, विमान सेवक, वैमानिक हे बहुतेक सेवुलचेच होते आणि त्यांची संख्या १०१८३ होती. एशियाना एरलाइन्स ही एर बुसानची सर्वात मोठी भागीदार आहे. एर बुसण ही बुसण मेट्रोपोलिटोण शहरातील प्रादेशिक एकत्रित वाहन व्यवस्था सांभाळणारी कमी खर्च असणारी सेवा आहे.अलीकडे एशियाना एरलाइन्स साऊथ कोरियाच्या राष्ट्रीय फूट बॉल टीम आणि अध्यक्षीय कप २०१५ला स्पॉन्सर करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →