सौदिया

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सौदिया

सौदी अरेबियन एरलाइन्स किंवा सौदिया (अरबी: الخطوط الجوية العربية السعودية) ही सौदी अरेबिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४५ साली स्थापन झालेल्या सौदियाचे मुख्यालय जेद्दा येथे असून तिच्या ताफ्यामध्ये १५३ विमाने आहेत. सध्या सौदियामार्फत जगातील ८० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.

सौदिया अरेबियन एर लाइन ही स्वतंत्र झेंडाधारी मुख्य ठिकाण जेद्दा असणारी विमान सेवा आहे. ही एर लाइन मुख्यतः जेद्दा-किंग अब्दुलजीज अंतरराष्ट्रीय विमानातळावरून (JED) चालविली जाते. रियाध-किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ (RUH), आणि दमन-किंग फाद आंतरराष्ट्रीय विमानतळ (DMM) ही याची इतर मुख्य केद्रे आहेत. कंपनीने २८ नोव्हेंबर १९९९ रोजी न्यू दमन हा विमानतळ व्यावसायिक तत्त्वावर चालविण्यासाठी घेतला.. त्यानंतर देहरान आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लष्करी विमानतळ म्हणून उपयोगात आणला. मध्य पूर्व देशांत मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होण्याच्या दृष्टीने एमिरेटस आणि कतार एरवेझ नंतर या एरवेझचा तिसरा क्रमांक लागतो. मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या देशांचा समावेश असणाऱ्या १२० ठिकाणी ही एर लाइन देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय नियमित सेवा देणारी एर लाइन आहे. रमझान आणि हज यात्रेच्या वेळी सरकारसाठी देशी आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुरवली जाते.. सौदिया एर लाइन ही अरब एर प्रवासी संघटनेची सभासद आहे. या एरलाइनने स्काय टीम एर लाइन्स बरोबर २९ मे २०१२ रोजी हितैक्य साधले..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →