वेस्टजेट ही कॅनडा देशातील एक प्रवासी विमानवाहतूक कंपनी आहे. कॅनडातील प्रमुख एरलाइन्सच्या स्पर्धेत प्रवाशांना किफायतशीररीत्या कमी खर्चात प्रवास करता यावा म्हणून या एरलाइनचा उदय झाला. ही एरलाइन देशात आणि देशाबाहेर १०० ठिकाणी विमान सेवा देते. आजच्या घडीला वेस्टजेट एर कॅनडाखालोखाल देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे. वेस्टजेटकडे सध्या ४२५ विमाने आहेत आणि ती प्रत्येक दिवशी ४५००० पेक्षाही जादा प्रवासी वाहतूक करतात. सन २०१३ मध्ये या कंपनीने १८५ लाख प्रवाशांची ने-आण केली. आणि उत्तर अमेरिकेतील ९ क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणारी विमान कंपनी ठरली. या कंपनीत १०००० कर्मचारी काम करतात. यांची संघटना नाही आणि वेस्टजेटचा इतर कोणत्याही एरलाइन्स बरोबर करार नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्टजेट एरलाइन्स
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.