मेसा एरलाइन्स

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मेसा एरलाइन्स

मेसा एरलाइन्स, इंक. ही एक अमेरिकन प्रादेशिक विमान कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय फिनिक्स (अ‍ॅरिझोना) येथे आहे. मेसा एरलाइन्स रिपब्लिक एरवेझ होल्डिंग्जची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. मेसा युनायटेड एरलाइन्सचा भाग असलेल्या युनायटेड एक्सप्रेस या विमानकंपनीसाठी एम्ब्राएर १७५ विमानांचा ताफा चालवते. मेसा एरलाइन्स युनायटेड स्टेट्स, क्युबा, मेक्सिको आणि कॅनडामधील ७३ शहरांमधून विमानसेवा पुरवते. मेसाची सेवा मुख्यत्वे लहान विमानतळांना आहे. ह्युस्टन-आंतरखंडीय आणि वॉशिंग्टन-डलेस येथे कंपनीची ठाणी आहेत. २०२४ मध्ये मेसामध्ये १,९९२ कर्मचारी होते व दररोज सरासरी २७९ उड्डाणे झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →