कम्युटेर किंवा कम्युटएर ही अमेरिकेमधील एक प्रादेशिक विमान कंपनी आहे. २०२६ च्या सुरुवातीस कम्युटेर युनायटेड एक्सप्रेसच्या वतीने आठवड्यातून १,६०० हून अधिक उड्डाणे करते व त्यांद्वारे ७५ पेक्षा अधिक देशांतर्गत आणि मेक्सिकोमधील ३ गंतव्यस्थानांवर सेवा पुरवते. कंपनीचा चा एम्ब्राएर ईआरजे १४५ विमानांचा ताफा वॉशिंग्टन-डलेस आणि ह्युस्टन-इंटरकॉन्टिनेंटल येथील तळांवरून उड्डाण करतो. २६ जुलै २०२२ रोजी कंपनीने आपल्या नावात छोटा बदल केला.
ही कंपनी १९८९ मध्ये न्यू यॉर्कमधील प्लॅट्सबर्ग येथील क्लिंटन काउंटी विमानतळावर होते. १ ऑगस्ट १९८९ रोजी यूएसएअरच्या मार्केटिंग संलग्न कंपनी म्हणून तिचे कामकाज सुरू झाले.
कम्युटेर
थोडक्यात पण महत्त्वाचे.