अमेरिकन एरलाइन्स

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अमेरिकन एरलाइन्स, इंक. ही अमेरिकेतील एक प्रमुख एरलाइन आहे जिचे मुख्यालय डॅलस–फोर्ट वर्थ मेट्रोप्लेक्समध्ये फोर्ट वर्थ, टेक्सास येथे आहे. ही कंपनी ने-आण केलेले प्रवासी आणि दैनंदिन उड्डाणांच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी विमानकंपनी आहे. तिच्या प्रादेशिक उपकंपन्या आणि अमेरिकन ईगल या नावाखाली काम करणाऱ्या कंत्राटी कंपन्यांसह ४८ देशांमधील सुमारे ३५० गंतव्यस्थानांवर दररोज ६,८०० पेक्षा अधिक उड्डाणांचे विस्तृत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत जाळे चालवते. ही विमानकंपनी जगातील तीन प्रमुख एरलाइन युतींपैकी एक असलेल्या वनवर्ल्ड युतीची संस्थापक सदस्य आहे.

अमेरिकन एरलाइन्स आणि अमेरिकन ईगलची दहा मुख्य ठाणी आहेत. यांतील डॅलस फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ (DFW) हे या एरलाइनचे सर्वात मोठे ठाणे आहे. शार्लोट डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळ (CLT) हे दुसरे सर्वात मोठे केंद्र असून ते आग्नेय आणि अटलांटिकपार प्रवासासाठीचे प्राथमिक प्रवेशद्वार म्हणून काम करते. मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ (MIA) आणि फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ (PHL) हे तिसऱ्या स्थानावर आहेत: फिलाडेल्फिया हे पश्चिम अमेरिका आणि युरोपमधील उड्डाणांसाठी प्रमुख जोडणी बिंदू म्हणून काम करते, तर मायामी हे कॅरिबियन, दक्षिण अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेच्या प्रवासासाठी प्रमुख केंद्र आहे. ही एरलाइन दरवर्षी २० कोटींहून अधिक प्रवाशांना सेवा देते आणि दररोज सरासरी ५ लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. २०२४मध्ये या कंपनीमध्ये १०३,४४० कर्मचारी काम करीत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →