डॅलस

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

डॅलस

डॅलस हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे व अमेरिकेमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. सुमारे ११.९८ लाख लोकसंख्या असलेले हे शहर ६४.७७ लाख वस्तीच्या व अमेरिकेमधील चौथ्या क्रमांकाच्या डॅलस-फोर्ट वर्थ महानगरामधील प्रमुख शहर आहे. ३७४ अब्ज डॉलर इतकी उलाढाल असलेली डॅलसची अर्थव्यवस्था अमेरिकेमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.

टेक्सासच्या ईशान्य भागात इ.स. १८४१ साली स्थापन झालेले डॅलस शहर खनिज तेल व कापसाचे मोठे व्यापार व वाहतूक केंद्र म्हणून वर आले. सध्या बँकिंग, दूरध्वनी, उर्जा, आरोग्यसेवा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी वैविध्यपूर्ण उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र असलेले डॅलस एक जागतिक शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →