मिलवॉकी हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या विस्कॉन्सिन राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर विस्कॉन्सिनच्या पूर्व भागात लेक मिशिगनच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले असून ते शिकागो शहराच्या उत्तरेला ९० मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली ५.९५ लाख शहरी व १५.५५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले मिलवॉकी अमेरिकेमधील २८वे मोठे शहर व ३९वे महानगर क्षेत्र आहे.
मिलवॉकीची स्थापना १८४६ साली सॉलोमन जुनू ह्या फ्रेंच शोधकाने केली. त्यानंतर येथे जर्मन वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले. मिलवॉकीवर जर्मन संस्कृतीचा पगडा आजही जाणवतो. विसाव्या शतकामध्ये एक मोठे औद्योगिक केंद्र असलेल्या मिलवॉकीची गेल्या काही दशकांमध्ये अधोगती झाली आहे.
मिलवॉकी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!