बाल्टिमोर (इंग्लिश: Baltimore) हे अमेरिकेच्या मेरीलॅंड राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मेरीलॅंड प्रांताच्या पूर्व-मध्य भागात अटलांटिक महासागराच्या चेसापीक ह्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. ६.२१ लाख शहरी व २६.९१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले बाल्टिमोर अमेरिकेमधील २१वे मोठे शहर व विसाव्या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी.पासून केवळ ४० मैल अंतरावर असल्यामुळे अमेरिकेच्या पूर्व समुद्र किनाऱ्यावरील बाल्टिमोर हे एक महत्त्वाचे शहर मानले जाते. येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ जगातील एक आघाडीचे संशोधन विद्यापीठ आहे.
एकेकाळी अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर व एके काळी एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या बाल्टिमोरचा गेल्या काही दशकांमध्ये ऱ्हास झाला आहे परंतु येथील व्यवसायाचे स्वरूप उत्पादनाकडून सेवेकडे वळवल्यामुळे येथील उद्योगांचे काही अंशी पुनरुज्जीवन होत आहे. शहर परिसराचे क्षेत्रफळ ९२.०५ चौरस मैल (२३८.४ चौ. किमी) इतके आहे व त्यापैकी ११.११ चौरस मैल (२८.८ चौ. किमी) एवढा भाग जलव्याप्त आहे.
बाल्टिमोर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.