बफेलो (न्यू यॉर्क)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बफेलो (न्यू यॉर्क)

बफेलो (इंग्लिश: Buffalo) हे अमेरिका देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (न्यू यॉर्क शहराच्या खालोखाल) आहे. हे शहर न्यू यॉर्क राज्याच्या पश्चिम भागात ईरी सरोवराच्या व नायगारा नदीच्या काठावर वसले असून नायगारा धबधबा बफेलोपासून १७ मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली २,६१,३१० इतकी लोकसंख्या असलेले बफेलो अमेरिकेतील ७०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

१९व्या शतकाच्या सुरुवातीस स्थापन झालेले बफेलो त्या शतकादरम्यान अमेरिकेमधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर होते. ईरी कालव्याच्या उद्घाटनानंतर बफेलोला वाहतूक केंद्र म्हणून मोठे महत्त्व लाभले. त्यामुळे येथील औद्योगिक धंद्यांची झपाट्याने भरभराट झाली. परंतु विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून येथील उद्योग घसरणीला लागला व येथील लोकसंख्या झपाट्याने कमी होत गेली. सध्या आरोग्यसेवा व शिक्षण हे येथील प्रमुख उद्योग आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →