न्यू यॉर्क (इंग्लिश: New York) हे अमेरिकेच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. न्यू यॉर्क हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.
न्यू यॉर्कच्या उत्तरेला कॅनडाचे ओन्टारियो व क्वेबेक हे प्रांत, वायव्येला ओन्टारियो सरोवर, पूर्वेला ईरी सरोवर, दक्षिणेला पेनसिल्व्हेनिया व न्यू जर्सी, आग्नेयेला अटलांटिक महासागर तर पूर्वेला व्हरमॉंट, कनेटिकट व मॅसेच्युसेट्स ही राज्ये आहेत. आल्बनी ही न्यू यॉर्क राज्याची राजधानी असून न्यू यॉर्क शहर हे अमेरिकेतील सर्वात मोठे शहर ह्याच राज्याच्या अखत्यारीत येते. न्यू यॉर्क राज्य आणि न्यू यॉर्क शहर ह्यांत फरक करण्यासाठी बरेच वेळा राज्याचा उल्लेख 'न्यू यॉर्क राज्य' (New York State) असा स्पष्टपणे केला जातो.
न्यू यॉर्क राज्याची अर्थव्यवस्था अमेरिकेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यापैकी बव्हंशी उलाढाल न्यू यॉर्क शहराशी निगडित आहे. वाहतूक व्यवस्था, शिक्षण, संस्कृती इत्यादी सर्वच बाबतीत न्यू यॉर्क अमेरिकेचे एक आघाडीचे राज्य मानले जाते.
न्यू यॉर्क (राज्य)
थोडक्यात पण महत्त्वाचे.