न्यू जर्सी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

न्यू जर्सी

न्यू जर्सी (इंग्लिश: New Jersey, न्यू जर्झी ) हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले न्यू जर्सी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने अकराव्या क्रमांकाचे राज्य आहे.

न्यू जर्सीच्या पूर्वेला व दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला डेलावेर व पेनसिल्व्हेनिया व उत्तरेला न्यू यॉर्क ही राज्ये आहेत. ट्रेंटन ही न्यू जर्सीची राजधानी तर न्यूअर्क हे सर्वात मोठे शहर आहे. न्यू जर्सीमधील बव्हंशी लोक न्यू यॉर्क शहर व फिलाडेल्फिया ह्या महानगरांच्या क्षेत्रांत राहतात.

दरडोई उत्पन्नाच्या दृष्टीने न्यू जर्सी हे अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. येथील अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणावर न्यू यॉर्क शहरावर अवलंबून आहे व न्यू यॉर्क शहरामध्ये काम करणारे हजारो लोक न्यू जर्सीमध्ये वास्तव्य करतात. भारतीय वंशाच्या रहिवाशांच्या संख्येमध्ये न्यू जर्सीचा अमेरिकेत तिसरा क्रमांक लागतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →