क्लीव्हलंड (इंग्लिश: Cleveland) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (कोलंबसखालोखाल) व सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. क्लीव्हलंड शहर ओहायोच्या उत्तर भागात ईरी सरोवराच्या दक्षिण काठावर वसले आहे. १८१४ साली स्थापन करण्यात आलेले क्लीव्हलंड शहर विसाव्या शतकाच्या मध्याला अमेरिकेच्या मिड-वेस्ट ह्या भौगोलिक प्रदेशामधील एक मोठे औद्योगिक व वाहतूक केंद्र होते. येथील अर्थव्यवस्था बव्हंशी उत्पादन उद्योगावर (मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री) अवलंबून आहे. १९५० साली क्लीव्हलंड हे अमेरिकेमधील सातव्या क्रमांकाचे शहर होते व येथील लोकसंख्या जवळपास १० लाख इतकी होती.
येथील अवजड उत्पादन उद्योग बंद पडल्यामुळे गेल्या काही दशकांदरम्यान क्लीव्हलंडची अधोगती होत आहे. २००० साली ४,७८,४०३ इतकी लोकसंख्या असलेले व अमेरिकेतील ३३वे मोठे शहर असलेल्या क्लीव्हलंडने २०१० सालच्या जनगणनेत १७% घट पाहिली. सध्या येथील लोकसंख्या ३,९६,८१५ इतकी असून लोकसंख्येमध्ये सर्वात झपाट्याने घट होणाऱ्या शहरांपैकी क्लीव्हलंड एक आहे.
क्लीव्हलँड
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.