सेंट लुईस (इंग्लिश: Saint Louis) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिसूरी राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (कॅन्सस सिटीखालोखाल) व सर्वात मोठे महानगर आहे. हे शहर मिसूरीच्या पूर्व भागात इलिनॉय राज्याच्या सीमेवर व मिसिसिपी नदीच्या काठावर वसले आहे. ३.१९ लाख शहरी व २८.४५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले सेंट लुईस अमेरिकेमधील ५८वे मोठे शहर व १६वे मोठे महानगर आहे.
इ.स. १७६४ साली मिसिसिपी नदीवरील एक बंदर म्हणून स्थापन केलेले सेंट लुईस १९व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेमधील चौथ्या क्रमांकाचे शहर होते. अमेरिकन यादवी युद्धानंतर येथील लोकसंख्या झपाट्याने वाढली. इ.स. १९०४ साली सेंट लुईसमध्ये उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा खेळवल्या गेल्या. इ.स. १९५० नंतर येथील लोकसंख्या घसरणीला लागली.
सध्या अमेरिकेच्या मध्य-पूर्व भागातील एक प्रमुख शहर असलेल्या सेंट लुईसची अर्थव्यवस्था सेवा, उत्पादन व पर्यटनावर अवलंबून आहे. अमेरिकेमधील अनेक मोठ्या कंपन्यांची मुख्यालये येथे आहेत. गेटवे आर्च ही सेंट लुईसची सर्वात प्रसिद्ध खुण आहे.
सेंट लुईस (मिसूरी)
या विषयातील रहस्ये उलगडा.