मिनीयापोलिस (इंग्लिश: Minneapolis) हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील सर्वांत मोठे शहर व राज्याची राजधानी सेंट पॉलचे जुळे शहर आहे. २०१० साली ३.८२ लाख लोकसंख्या असलेले मिनियापोलिस अमेरिकेमधील ४८वे मोठे शहर आहे. मिनियापोलिस शहरामधून मिसिसिपी नदी आणि शहराच्या बाजूने मिनेसोटा नदी वाहते. मिनियापोलिस शहरात जवळपास २० मोठी तळी असून तळ्यांचे शहर असा याचा लौकिक आहे. मिनियापोलिस हे नावदेखील मिनिया म्हणजे पाणी आणि पोलीस म्हणजे शहर किंवा गाव, या शब्दांवरून पडले आहे.
शिकागो खालोखाल अमेरिकेच्या मिड-वेस्ट परिसरातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या मिनियापोलिसमधील वाणिज्य, आरोग्यसेवा इत्यादी प्रमुख उद्योग आहेत. येथील मॉल ऑफ अमेरिका हा अमेरिकेमधील सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलपैकी एक आहे.
मिनीयापोलिस
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.