मेम्फिस (टेनेसी)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मेम्फिस (टेनेसी)

मेम्फिस हे अमेरिका देशाच्या टेनेसी राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर टेनेसीच्या नैऋत्य भागात आर्कान्सा व मिसिसिपी राज्यांच्या सीमेजवळ व मिसिसिपी नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ६.४७ लाख लोकसंख्या असलेले मेम्फिस अमेरिकेमधील विसव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

मेम्फिस हे अमेरिकेमधील मालवाहतूकीचे एक प्रमुख केंद्र आहे. मेम्फिस आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मालवाहतूकीच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. फेडेक्स ह्या कंपनीचे मुख्यालय मेम्फिस येथेच असून फेडेक्स एक्सप्रेस ह्या जगातील सर्वात मोठ्या मालवाहतूक करणाऱ्या विमानकंपनीचे केंद्र (हब) मेम्फिस विमानतळावरच आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →