इंडियानापोलिस

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

इंडियानापोलिस

इंडियानापोलिस (इंग्लिश: Indianapolis) ही अमेरिकेच्या इंडियाना राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर इंडियाना राज्याच्या मध्यभागात एका सपाट पठारावरील ९६३.५ वर्ग किमी जागेवर वसले आहे. २०१० साली ८.३९ लाख शहरी व १७.५६ लाख महानगरी लोकसंख्या असलेले इंडियानापोलिस मिड-वेस्ट भौगोलिक प्रदेशामधील दुसऱ्या क्रमांकाचे (शिकागोखालोखाल) तर अमेरिकेमधील बाराव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तसेच इंडियानापोलिस महानगर अमेरिकेमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या भागंपैकी एक आहे.

इंडियानापोलिसची स्थापना इ.स. १८२१मध्ये नवीन इंडियाना राज्याची राजधानी ह्या हेतूने करण्यात आली. राज्याच्या मधोमध असल्यामुळे हा भाग राजधानीसाठी निवडला गेला. स्थापनेनंतर लवकरच अत्यंत मोक्याच्या स्थानावर असल्यामुळे ह्या शहराचे एक वाहतूक केंद्र असे महत्त्व वाढू लागले. सध्या इंडियानापोलिस मिडवेस्ट भागामधील एक मोठे औद्योगिक शहर असून निवासाकरिता अमेरिकेमधील सर्वोत्तम स्थानांपैकी एक मानले गेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →