फिलाडेल्फिया हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील सर्वात मोठे शहर असून लोकसंख्येनुसार अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. फिलाडेल्फिया पेनसिल्व्हेनिया राज्याच्या आग्नेय कोपऱ्यात न्यू जर्सी राज्याच्या सीमेवर डेलावेर नदीच्या काठावर वसले असून ते न्यू यॉर्क शहराच्या नैऋत्येला ९० मैल अंतरावर तर वॉशिंग्टन डी.सी.च्या ईशान्येला १४० मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली फिलाडेल्फियाची लोकसंख्या १५.२६ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ६० लाख होती.
ऑक्टोबर २७, इ.स. १६८२ रोजी विल्यम पेन ह्या ब्रिटिश व्यापाऱ्याने स्थापन केलेल्या फिलाडेल्फियाला अमेरिकेच्या इतिहासात मोठे महत्त्व आहे. जुलै ४, इ.स. १७७६ रोजी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा येथेच लिहिला गेला. वॉशिंग्टन डी.सी. पूर्वी अमेरिकेची राजधानी फिलाडेल्फिया येथे होती.
फिलाडेल्फिया
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.