पिट्सबर्ग

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

पिट्सबर्ग

पिट्स्बर्ग (इंग्लिश: Pittsburgh) हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर पेनसिल्व्हेनियाच्या नैऋत्य भागात अलेघेनी व मनोंगहेला ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. ओहायो नदीची सुरुवात ह्या संगमामधूनच होते. पिट्स्बर्ग शहराची लोकसंख्या ३ लाख तर अमेरिकेमधील २२व्या मोठ्या पिट्स्बर्ग महानगराची लोकसंख्या २३.५ लाख इतकी आहे.

अमेरिकेतील स्टील उत्पादन उद्योगाचे मोठे केंद्र असलेल्या पिट्स्बर्गमध्ये एकूण ४४६ पूल आहेत ज्यांमुळे त्याची टोपणनावे "The City of Bridges" व "The Steel City" ही पडली आहेत.

अनेक अहवालांनुसार पिट्स्बर्ग हे अमेरिकेमधील सर्वात निवासयोग्य शहर मानले गेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →